१ कोटींची नौकरी नाकारली आणि सुरु केला स्वताचा मेकअप प्रोडक्ट्स चा बिजनेस


शुगर कॉस्मेटिक्सची सी.ई.ओ विनिता सिंग (Vineeta Singh – CEO – SUGAR Cosmetics) यांनी स्वत:च्या मेहनतीवर आपला कोटींचा बिझनेस उभा करत स्वत:ला सिद्ध केले. आपल्याला आपला बिझनेस उभा करायचा आहे आणि एक यशस्वी उद्योजिका बनायचे आहे हे स्वप्न विनिता सिंग यांनी १७ व्या वर्षीच पाहिले’ होते आणि त्यासाठी काम सुद्धा करायला सुरुवात केली होती. त्यांची सक्सेस स्टोरी प्रत्येक स्त्री साठी एक आदर्श आहे.

यशस्वी व्हायचे तर ते एका रात्रीत तर शक्य नाहीच, त्यासाठी अनेक संकटे झेलावी लागतात. असा अनेक संकटांचा सामना विनिता सिंग (Vineeta Singh) यांना करावा लागला. पण हार न मानता त्यांनी आपले स्वप्न पूर्ण केले आणि फोर्ब्स इंडियाच्या वूमेन पावर लिस्ट २०२१ मध्ये सुद्धा त्यांचे नाव समाविष्ट झाले. कोणत्याही उद्योजकेसाठी हा एक मोठा बहुमान असतो. काहीही मिळवायचे असो त्यासाठी निरंतर मेहनत घ्यावीच लागते. त्याला पर्याय नाही हा संदेश त्या सर्व तरुणांना देतात.


विनिता सिंग (Vineeta Singh) यांचे शिक्षण आय.आय.टी मद्रासमध्ये झाले तर मॅनेजमेंटची पदवी आय.आय.एम अहमदाबाद येथे पूर्ण केली.त्यांचे पती कौशिक मुखर्जी आणि विनिता सिंग (Vineeta Singh) यांनी मिळून शुगर कॉस्मेटिक्सची (Sugar Cosmetics) सुरुवात केली,त्यासाठी त्यांनी त्यांची शेवटची तीस लाख रुपयांची एफ.डी मोडली होती

विनिता सिंग (Vineeta Singh) यांचे वडील तेज सिंग एम्स मध्ये संशोधक होते,त्यांनी कॅन्सर आणि बाकी आजारांसाठी लागणाऱ्या औषधांना अधिक सक्षम करण्यासाठी प्रथिनांच्या संरचनेचा संशोधन करण्यासाठी पूर्ण आयुष्य वाहून टाकले होते.विनिता सिंग यांच्या कुटुंबात कोणीही व्यवसाय करत नव्हते,त्यामुळे तसा त्यांना व्यवसायाचा काहीही अनुभव नव्हता.


विनिता सिंग (Vineeta Singh) यांचे शिक्षण पूर्ण झाल्यावर मोठ्या नामांकित बँकेत सालाना १ करोड या पगाराची नोकरीची संधी त्यांना मिळाली होती, त्या वेळी विनिता सिंग (Vineeta Singh) यांचे वय केवळ २३ वर्षे इतके होते, विनिता सिंग (Vineeta Singh) यांनी त्यासाठी सरळ नकार दिला होता,त्यांच्या या निर्णयाची चर्चा बराच काळ होत होती,पण विनिता सिंग यांना स्वतःचे वेगळे असे काहीतरी करायचे होते आणि त्यांचा निर्णय ठाम होता.

त्यादृष्टीने त्यांनी २००७ मध्ये Quetzal नावाचे स्टार्ट अप सुरू केले,त्यामध्ये ज्या लोकांना नोकरी हवी आहे अशा लोकांच्या वैयक्तिक किंवा भौगोलिक माहितीची पडताळणी करण्याची सेवा पुरवली जात असे पण या कामात विनिता सिंग यांना यश मिळाले नाही.त्या वेळी विनिता सिंग यांना हताश व्हायला झाले होते,एकतर इतक्या मोठ्या पगाराची नोकरी सोडून व्यवसाय करण्याचा घेतलेला निर्णय त्यात पहिल्याच प्रयत्नात आलेले अपयश,त्यामुळे त्यांना आपला निर्णय चुकला तर नाही ना असे वाटू लागले होते,परिस्थिती इतकी कठीण झाली होती की त्यांनी दर महिना केवळ दहा हजार रुपये पगाराची नोकरीही केली.


पण त्यांचे स्वप्न हरले नव्हते,उमेद संपली नव्हती, मग पुढे २०१२ मध्ये त्यांनी Fab Bag ची सुरुवात केली,ज्यामध्ये महिलांना अगदी माफक फी भरून प्रत्येक महिन्यात सौदर्य प्रसाधनांची सेवा पुरवली जात होती.यामुळे ग्राहकांची विशेषतः महिलांची मुख्य गरज काय आहे हे समजण्यासाठी विनिता सिंग (Vineeta Singh) यांना खूप मोठा फायदा झाला.तो असा की यात समाविष्ट असलेल्या महिलांनी विनिता सिंग (Vineeta Singh) सोबत त्यांची आवड निवड, त्वचेच्या तक्रारी तसेच आवड नसलेल्या गोष्टी सांगितल्या.ही सगळी माहिती विनिता सिंग यांनी जेंव्हा पडताळून पाहिली तेंव्हा त्यांच्या हे लक्षात आले की विदेशी आणि स्थानिक मेकअप ब्रँड हे भारतीय त्वचा विकारांवर नीट काम करत नाहीत,पाहिजे त्या प्रमाणात परिणाम दिसून येत नाहीत.

आपण जे काही मेकअप साहित्य वापरतो त्याचा योग्य वापर कसा करावा याची जाण आपल्याला असणे गरजेचे आहे तसेच हा मेकअप प्रदूषित ठिकाणी किंवा प्रवासातही दीर्घ काळ टिकला पाहिजे असे विनिता सिंग यांना वाटे.त्यांना मिळालेल्या माहितीच्या आधारावर त्यांनी शुगर कॉस्मेटिक्सची सुरुवात केली ते साल होते २०१५. सौदर्य प्रसाधनांचा वापर कसा करावा हे ग्राहकांना समजण्यासाठी त्यांनी सोशल मीडियाचा पुरेपूर वापर केला यात इंस्टाग्राम, यू ट्यूब आणि विनिता सिंग यांचे शुगर अँप यांचा समावेश होता.

विनिता सिंग यांनी केवळ त्यांच्या मेकअप उत्पादनांच्या दर्जावरच काम केले नाही तर महिलांना मेकअप कसा वापरायचा हेही शिकवले. सोशल मीडियापासून ते इतर अनेक प्लॅटफॉर्मचा वापर त्यांनी ग्राहकांना कंपनीपर्यंत पोहोचवण्यासाठी केला. विनिता पती कौशिक मुखर्जींसोबत ही कंपनी चालवतात. शुगर कंपनीची सुरूवात दोघांनी मिळून केली होती.

शुगर कॉस्मेटिक्स हे एक डिजिटल ऑनलाईन सुविधा देणारे पहिले दुकान आहे. आज त्यांचे ऑफलाईन सुद्धा खूप दुकाने आहेत. तब्बल १३० पेक्षा जास्त शहरात २५०० पेक्षा जास्त आउटलेट आहेत.त्यांच्या प्रसाधनांचे उत्पादन केवळ भारत देशापुरते मर्यादित नसून जर्मनी, इटली आणि कोरिया मध्ये सुद्धा होत आहे आणि अमेरिकेत सुद्धा त्यांचे प्रसाधने पुरवले जातात. भारताची युवा महिला हे विनिता सिंग यांच्या उत्पादनांचे मुख्य केंद्र आहे.

सुरुवातीला शुगर कॉस्मेटिक्सचा निव्वळ नफा दोन करोडपेक्षा कमी होता,तिथे आज दिवसाची विक्री दोन करोड रुपये आहे तर २०१९-२० मध्ये निव्वळ नफा १०५ करोड रुपये इतका होता.विनिता सिंग (Vineeta Singh) यांच्या शुगर कॉस्मेटिक्सचे मुख्य प्रॉडक्ट आहे स्कार्लेट ओ हारा लिपस्टिक. त्यांच्या सौदर्य प्रसाधनं वर सवलत मिळत नसूनही दर वर्षी तीस हजार ऑर्डर पूर्ण होतात कारण यांनी उत्पादनांची गुणवत्ता कायम ठेवली आहे.


जिथे काही कंपन्यांना १०० करोडोंची कमाई करायला वीस वर्षे लागतात तिथे विनिता सिंग यांनी केवळ ४ वर्षात हे यश मिळवले आहे.२०१९ मध्ये भारतात त्यांनी पहिले दुकान सुरू केले तर आज ९२ शहरांमध्ये ७०० पेक्षा जास्त उत्पादने बाजारात उपलबध आहेत.जिथे काही कंपन्यांना १०० करोडोंची कमाई करायला वीस वर्षे लागतात तिथे विनिता सिंग यांनी केवळ ४ वर्षात हे यश मिळवले आहे .२०१९ मध्ये भारतात त्यांनी पहिले दुकान सुरू केले तर आज ९२ शहरांमध्ये ७०० पेक्षा जास्त उत्पादने बाजारात उपलबध आहेत.

शुगर कॉस्मेटिक्स (Sugar Cosmetics) कंपनीचे प्रोडक्ट्स ३ थीमवर आधारित आहेत, ज्यामध्ये दीर्घकाळ टिकणारी (long lasting beauty products), वेदर प्रूफ (weather proof) आणि प्रत्येक ऋतुंमध्ये वापरता येतील असे उत्पादन. शुगर कॉस्मेटिक्स (Sugar Cosmetics) डिजीटल फर्स्ट स्‍टार्टअप कंपनी आहे, ज्याच्या टार्गेट कंन्जूमर भारतीय तरुणी आहेत, परंतु त्‍याची उत्‍पादने भारताशिवाय जर्मनी, इटली आणि कोरिया यांसारख्या देशांमध्ये तयार केली जातात. भारतात ब्युटी इंडस्ट्रीला प्रचंड मोठी मागणी आहे. मेकअपबद्दल बोलायचं झालं तर आजकाल प्रत्येक स्त्रीलाच याची गरज भासते.


२०१७ मध्ये त्यांच्या कंपनीला “सिरीज ए फंडिंग” सुद्धा मिळाले. जर तुम्हाला या जगात सर्वोत्तम, सर्वश्रेष्ठ अस काही करायचं असेल तर त्यासाठी सातत्याने कामास वाहून घ्यायला हवे आणि चांगल्या परिणाम साठी संयम ठेवायला हवा, हा विनिता सिंग यांच्या यशाचा मंत्र आहे. विनिता सिंग या केवळ व्यवसायातच पारंगत नाहीत तर त्या उत्तम धावपटू पण आहेत. इतकेच नव्हे तर त्यांनी अल्ट्रा मेरेथोन आणि ट्राय इथीलिस्त यासारख्या नामांकित १४ पेक्षा जास्त स्पर्धेत सहभाग घेऊन सलग तीन वर्षे ८९ किमी धावा पूर्ण केल्या आहेत.

विनिता सिंग (Vineeta Singh) यांनी वार्षिक एक करोड रुपये पगार असलेली नोकरी सोडली, पण व्यवसायात रोज एक करोड रुपये मिळतील इतके घवघवीत यश मिळवून यश पायाशी खेचून आणले.

अशा प्रकारे त्यांनी जगासमोर एक उत्तम आदर्श उभा केला आहे.व्यवसायाची कोणतीच माहिती किंवा समज नसताना सुद्धा आपण शून्यातून विश्व निर्माण करू शकतो हेच त्यांनी दाखवून दिले आहे.
Post a Comment (0)
Previous Post Next Post