एक महान गणितज्ञ “मानवी संगणक” शकुंतला देवी


शकुंतला देवी यांना “मानवी संगणक” म्हणून ओळखले जाते. कारण त्या कठीणातील कठीण गणित सुद्धा काही सेकंदात सोडवत असत. एक गणितज्ज्ञ, ज्योतिषी, लेखिका, बासरी वादक अशा अनेक कला विलक्षण प्रतिभा असलेल्या व्यक्तीतच असू शकतात. त्या शकुंतला देवी नावाच्या व्यक्तीत होत्या. १९८२ साली शकुंतला यांनी १३ अंकांचा गुणाकार केवळ २८ सेकंदात सांगून, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद केली.

शकुंतलादेवीचे वडील सर्कसमध्ये काम करत होते. तीन वर्षाच्या शकुंतलाला पत्त्याचे खेळ शिकवताना तिच्या अफाट स्मरणशक्तीचे त्यांना ज्ञान झाले. त्यांनाच शकुंतलादेवीमधील झपाट्याने गुणाकार-भागाकार करण्याची शक्तीची पहिल्यांदा ओळख पटली. सर्कस सोडून ते शकुंतलाचेच रोडशो करू लागले. वयाच्या ६ व्या वर्षी शकुंतलाने म्हैसूर विद्यापीठात आपल्या अंकगणितीय कौशल्याचे प्रदर्शन केले.


शकुंतला देवी १९४४ मध्ये लंडनला गेल्या .लंडनला गेल्यावर पुढे त्यांनी संपूर्ण जगामध्ये प्रवास केला आणि आपल्या बुद्धिमत्ता आणि गणितीय कौशल्याचे वेगवेगळे चमत्कार दाखवून त्यांनी संपूर्ण जगाला चक्रावून सोडले.१९७६ साली आपल्या अमेरिका दौऱ्यात त्यांनी संगणकापेक्षा अधिक वेगाने आकडेमोड पूर्ण करून त्याची उत्तरे परीक्षकांसमोर अचूक सादर केली

1976 मध्ये शकुंतला देवी. Credit Barton Silverman/The New York Time

इ.स. १९७७मध्ये डलास विद्यापीठात शकुंतलाचा मुकाबला तत्कालीन सर्वात जलद काॅम्प्यूटर ‘युनिव्हॅक’ शी झाला. तेथे शकुंतलादेवीने एका २०१ अंकी संख्येचे २३वे मूळ ५० सेकंदात काढले व फळ्यावर लिहिले. हे मूळ काढायला काॅम्प्यूटरला ६२ सेकंद लागले.

१८ जून १९८० मध्ये त्यांना ७६८६३६९७७४८७० आणि २४६५०९९७४५७७९ ह्या दोन संख्या गुणाकारासाठी देण्यात आल्या .हे आकडे लंडनच्या इम्पीरियल कॉलेजच्या संगणक विभागाने निवडलेले होते .शकुंतला देवी यांनी या दोन आकड्यांचा अचूक गुणाकार करून दाखवत केवळ २८ सेकंदामध्ये १८९४७६६८१७७९९५४२६४६२७७३७३० हे उत्तर दिले. १३ आकडी दोन संख्यांचा गुणाकार त्यांनी फक्त २८ सेकंदात पूर्ण केला.त्यांच्या याच कामगिरीमुळे त्यांना HUMAN COMPUTER म्हणून ओळखले जाऊ लागले आणि असामान्य प्रतिभेला पाहता त्यांच्या नावाची नोंद गिनीज बुक ऑफ द वर्ल्ड मध्ये सुद्धा झालेली आहे.


सन १९६० मध्ये शकुंतला देवी यांचा विवाह पश्चिम बंगाल चे एक IAS अधिकारी परीशोत बॅनर्जी यांच्याशी झाला होता, विवाहानंतर त्यांनी एका मुलीला जन्म दिला. काही वर्ष त्यांचे वैवाहिक जीवन आनंदात गेले, पण काही वर्षानंतर काही कारणास्तव त्या त्यांच्या पतीपासून वेगळ्या झाल्या आणि १९८० मध्ये आपल्या मुलीला घेवून त्या परत बंगलोर ला आल्या. त्यांच्या मुलीचे नाव अनुपमा बॅनर्जी आहे. बंगलोर मध्ये त्यांनी अनेक अभिनेत्यांना तसेच राजनेत्यांना त्या भविष्यशास्त्राचा अभ्यास करून सल्ला देत असत. आयुष्याच्या शेवटच्या दिवसांमध्ये त्यांना स्वास घेण्यास अडचण आणि किडनी मध्ये वेदना होत होत्या आणि त्यांची तब्येत आणखी खालावत होती, त्यांच्या खालावलेल्या तब्येतीमुळे २१ एप्रिल २०१३ ला त्यांनी अखेरचा स्वास घेतला.

गुगलने शकुंतला देवी यांची ८४ वी जयंतनिमित्त डुडल बनवून त्यांना आदरांजली वाहिली होती.

शकुंतला देवी यांचे प्रसिद्ध पुस्तके

  1. द जॉय ऑफ नंबर
  2. द वर्ल्ड ऑफ होमो सेक्सुअल
  3. एस्ट्रोलॉजी फॉर यू
  4. पजल्स टू पजल्स यु
  5. फन विद नंबर्स

शकुंतलादेवीवरील एका हिंदी चित्रपटाची निर्मिती लंडनमध्ये सुरू होती. (१६ सप्टेंबर २०१९ची बातमी). शकुंतलादेवीचे काम विद्या बालन यांनी केले आहे. चित्रपट २०२० साली प्रकाशित झाला.


Post a Comment (0)
Previous Post Next Post