'डीहाइड्रेशन' चे जुने तंत्र वापरून, हैदराबादस्थित अनुभव भटनागर यांनी Zilli's हे स्टार्टअप सुरू केले आहे. ज्या अंतर्गत तो नैसर्गिक, प्रेज़रवेटिव-फ्री आणि रेडी टू कुक उत्पादने बनवत आहे.
प्रत्येक घरात लोक लसूण, आले आणि कांद्याचा वापर जेवणाची चव वाढवण्यासाठी करतात, परंतु ते जास्त काळ घरात ठेवणे व टिकवणे खूप कठीण असते. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी, उत्तर प्रदेशातील मुरादाबाद जिल्ह्यातील रहिवासी अनुभव भटनागर (Anubhav Bhatnagar) यांनी लॉकडाऊन दरम्यान त्यांचा स्टार्टअप Zilli's सुरू केला रेडी-टू-कूक मॉडेलवर घरगुती प्रिजर्वेटिव फ्री आणि ग्लू टेन-मुक्त खाद्यपदार्थ आणि मसाले पावडर बनवण्याचे काम सुरू केले. ज्यामुळे स्वयंपाक करण्याची प्रक्रिया सुलभ आणि आरोग्यदायी होते. तो देशभरात डझनभराहून अधिक उत्पादनांचे मार्केटिंग करत आहे, त्यामुळे त्याची आज उलाढाल 35 लाखांवर पोहोचली आहे.
अनुभवचे (Anubhav Bhatnagar) वडील आर्मी ऑफिसर आहेत, त्यामुळे त्यांनी वेगवेगळ्या शहरात शिक्षण घेतले आहे. २०१२ मध्ये अभियांत्रिकी पूर्ण केल्यानंतर त्यांनी हैदराबाद येथील एका कंपनीत अडीच वर्षे नोकरी केली. त्यानंतर अनुभवने काम सोडले आणि XLRI जमशेदपूरमधून डिप्लोमा पूर्ण करून हैदराबादला परतला.अनुभवने हैदराबादमध्ये २ वर्षे डिजिटल मार्केटिंग क्षेत्रात काम केले.
नोकरीच्या काळात अनुभव स्वतः स्वयंपाक करायचा. स्वयंपाक करताना 'आले-लसूण पेस्ट'चे पॅकेट काळजीपूर्वक वाचले आणि त्यात वापरल्या जाणार्या पदार्थांची माहिती झाली. त्याचा लक्षात आले की पेस्टचे शेल्फ-लाइफ वाढवण्यासाठी अनेक प्रेज़रवेटिव आणि एडिटिव वापरल्या गेल्या आहेत स्वयंपाक करताना तो विचार करू लागला की, कुठलेही रसायन न घालता आले आणि कांदा जास्त काळ वापरता येईल का? आपल्या खाद्यपदार्थांचे शेल्फ-लाइफ वाढवू शकतो का? अनुभव भटनागर (Anubhav Bhatnagar) यांनी यावर संशोधन करण्यास सुरुवात केली. यादरम्यान त्यांनी हैदराबादमधील CFTRI संपर्क साधला.
CFTRI च्या अनुभवात असे आढळून आले की ते डिहायड्रेशन तंत्रज्ञानासह अन्नाचे शेल्फ लाइफ वाढवू शकतात. ज्याचा उपयोग गावोगावी पापड, चिप्स किंवा लोणचे बनवण्यासाठी केला जातो. इथेच अनुभवने नवीन स्टार्टअप सुरू करण्याचा निर्णय घेतला. जेव्हा त्याने ही आइडिया त्याच्या काही मित्रांसोबत शेअर केली तेव्हा मित्रांनी सुचवले की होय, हे स्टार्टअप चांगले चालेल. मग अनुभव नि ३० हजार रुपये खर्चून त्यांनी हा नवनी स्टार्टअप व्यवसाय सुरू केला.
अनुभवने ग्राइंडर मशीन आणि ओव्हनच्या मदतीने लसूण आणि कांदा डिहाइड्रेट करून पावडर तयार केली. यामध्ये त्यांनी कोणत्याही प्रकारचे केमिकल किंवा प्रिजर्वेटिव वापरलेले नाही. एका बॉक्समध्ये पॅक करून, त्याने ते मित्रां सोबत शेयर केले आणि सोशल मीडियावर देखील पोस्ट केले, जे पाहून अनेकांनी प्रोडक्ट ची मागणी केली. अनुभव भटनागरला हे शिकायला एक वर्ष लागले. अनुभव सांगतो कि मी प्रोडक्ट बनवण्याबरोबरच मार्केटिंगवरही लक्ष केंद्रित केले.
अनुभवने (Anubhav Bhatnagar) त्याच्या उत्पादनाची तुलना आधीच बाजारात उपलब्ध असलेल्या उत्पादनांशी केली. त्यांचे क्वालिटी एनालिसिस केले, वेगवेगळ्या एग्जीबिशन मध्ये गेला, काही किरकोळ विक्रेत्यांशी बोलला आणि मार्केटिंगचे धोरण समजून घेतले. त्यानंतर २०२० मध्ये त्यांनी Zilli's नावाची स्वतःची कंपनी रजिस्टर केली आणि घरबसल्या काम करायला सुरुवात केली. गेल्या वर्षी लॉकडाऊनमुळे त्यांचे काम सुमारे दोन महिने बंद होते. जून २०२० पासून अनुभवने व्यावसायिक व्यासपीठावर पाऊल ठेवले. स्वत:च्या वेबसाइटसोबतच त्यांनी फ्लिपकार्ट आणि अम्याझोन च्या माध्यमातून त्यांच्या उत्पादनांचे मार्केटिंग सुरू केले.
लॉकडाऊनमुळे अनुभवला (Anubhav Bhatnagar) थोडा वेळ लागला, पण जेव्हा त्याचे काम सुरू झाले तेव्हा त्याच्या उत्पादनांची मागणी वाढली. अनुभव सांगतो कि या काळात लोकांना बाहेर पडता येत नव्हते, त्यामुळे ऑनलाइन मार्केटिंग करणे फायदेशीर ठरले. गेल्या एका वर्षात त्यांनी १२ हजारांहून अधिक ग्राहकांपर्यंत त्यांची उत्पादने पोहोचवली आहेत, ज्यामुळे त्यांनी ३५ लाख रुपयांचा व्यवसाय केला आहे. त्यानंतर अनुभवने हैदराबादमध्येही आपले ऑफिस उघडले आहे. ऑनलाइनसोबतच तो ऑफलाइन मार्केटिंगही करतो.
सुरुवातीच्या काळात अनुभव (Anubhav Bhatnagar) घरातूनच उत्पादने बनवत असत, मात्र मागणी वाढल्यानंतर त्याला मशिन्सची गरज भासू लागली. महागड्या आणि मोठमोठ्या मशीन्स भाड्याने घेऊन तो आपले काम करत असे. मसाले तयार करण्यासाठी लसूण किंवा कांदा प्रथम उन्हात वाळवला जातो. त्यानंतर ते यंत्राच्या साहाय्याने व्यवस्थित वाळवले जाते, त्यानंतर ग्राइंडरच्या साहाय्याने बारीक करून पावडर तयार केली जाते. त्यानंतर क्वालिटी टेस्टिंग करून त्याचे पॅकेजिंग केले जाते.
अनुभवकडे (Anubhav Bhatnagar) एकूण १३ उत्पादने आहेत, जसे की लसूण पावडर, आले पावडर, कांदा पावडर, मिरची पावडर, हळद दूध मसाला. या कामात अनुभव भटनागर यांनी ५ जणांना रोजगारही दिला आहे ते प्रोडक्शन सोबतच पॅकेजिंगचे हि काम करतात.
जास्तीत जास्त लोक अनुभव भटनागर (Anubhav Bhatnagar) कडून प्रेरणा घेऊन पुढे जातील, अशी अपेक्षा आहे. तुम्हाला अनुभव ची उत्पादने पहायची किंवा खरेदी करायची असल्यास येथे क्लिक करा zillis.in