देशातील पहिली महिला ऑटो चालक, वयाच्या १८ व्या वर्षी घर सोडले रूढ़ि परंपरा तोडून इतिहास घडवला – शीला डावरे

शीला डावरे या महाराष्ट्रातील पहिल्या महिला ऑटोरिक्षाचालक आहेत. त्यांनी सुमारे १३ वर्षे ऑटोरिक्षा चालविली व नंतर महिला ऑटोरिक्षा चालकांसाठी एक अकादमी सुरू केली. त्या परभणी जिल्ह्यात राहतात. त्यांना भारताचा फर्स्ट लेडी पुरस्कार मिळाला आहे. १९८८ मध्ये त्यांनी रिक्षा चालवण्यास सुरुवात केली. तेव्हाची परिस्थिती खूप वेगळी होती. रिक्षाचालकांमध्ये पुरुषांची मक्तेदारी, सामाजिक दृष्टिकोन यामुळे त्यांना सर्वच पातळ्यांवर संघर्ष करावा लागला. योग्य प्रशिक्षण, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर मी त्या यशस्वी झाल्या. त्यांच्या या कृतीची नोंद त्यावेळी लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्‌समध्ये झाली होती.


शीला डावरे या मूळच्या परभणी जिल्ह्यातल्या. त्यांना लहानपणापासूनचं गाड्या चालवण्याची आवड होती. १२ वीचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी वडिलांना रिक्षा चालवायची म्हणून सांगितलं. सहाजिकचं त्या काळात महिलेनं रिक्षा चालवायची म्हंटल्यावर आई वडिलांनी नकार दिला, या प्रकरणावरून मोठा वाद सुद्धा झाला.

घरच्यांच्या अशा वागण्यामुळं रागावलेल्या शीला यांनी रेल्वे स्टेशन गाठलं. तिथं बसल्या बसल्या आपल्या नशीबाला दोष देणाऱ्या शीला डावरे यांना समोर एक रेल्वेची लाईट चमकताना दिसली, आणि त्यांनी हिचं संधी मानली आपलं नसीब घडवण्याची. निदान दुसऱ्या ठिकाणी तरी आपल्याला इतका विरोध होणार नाही या विचाराने वयाच्या १८ व्या वर्षी शीला यांनी घर सोडायचा निर्णय घेतला.

शिला डावरे यांनी जेव्हा घर सोडलं तेव्हा १२ रूपये होते आणि त्या १२ रूपयांवर शिला डावरे यांनी पुणे गाठलं. पुण्यात रिक्षा चालवायला सुरुवात करायचं त्यांनी ठरवलं, पण इथेही त्यांना दबाव आणि विरोध अशा गोष्टींचा मोठा सामना करावा लागला. त्यांना बरीचं जण तर वेड्यात काढायची. हे काय लाली – पावडर लावण्याचं काम आहे का? असे टोमणे सुद्धा ऐकायला लागले, पण ह्या सर्व परिस्थिती चा सामना करत शिला डावरे ह्या मागे हटल्या नाही.


शीला डावरे यांनी रिक्षा चालवायचीचं हे ठरवलं होतं,पण अडचण अशी होती की त्या महिला असल्या कारणामुळे बरीचं जण त्यांना रिक्षा भाड्याने द्यायला घाबरायची. लोक हे मान्य करायला तयार नव्हती की एखादी महिला रिक्षा चालवेल.

त्यांना स्वतः ची रिक्षा घेण्यासाठी बराच खटाटोप केला परमीटसाठी त्यांना सगळीकडे खेटे घालावे लागले, तिथेही त्यांना उलट-सुलट बोलणं ऐकून घ्यावं लागलं. शीला डावरे एका मुलाखतीत सांगतात की, नशीबाला शोधून त्याला लाथ मारून उठवायचं होत.

शेवटी वैतागून त्यांनी थेट परिवहन मंत्र्यांची गाठ घेतली. मला जोपर्यंत परमिट मिळणार नाही तोपर्यंत मी इथून हलणार नाही, असं एकचं म्हणणं त्यांनी लावून धरलं. शेवटी परिवहन मंत्र्यांनी त्यांच्या अर्जावर शिक्का मोर्तब केला आणि शीला डावरे यांना रिक्षाचं परमिट मिळालं.

त्यांनंतर हळूहळू पैसे साठवून लोकशाही संघटना आणि युनियनच्या मदतीने स्वतःचा ऑटो विकत घेतला आणि रिक्षा चालवायला सुरुवात केली.


याच दरम्यान त्यांची भेट शिरीष कांबळे यांच्याशी झाली, शिरीष कांबळे सुद्धा रिक्षा चालक होते, या दोघा नवरा बायकोने २००१ पर्यंत रिक्षा चालवली. त्यानंतर त्यांनी स्वतःची ट्रॅव्हल कंपनी उघडली.

१९८८ ते २००१ या दरम्यान म्हणजे वर्ष शीला डावरे यांनी ऑटोपासून मॅटाडोरपर्यंत सगळ्या प्रकारच्या गाड्या चालवल्या. आज शीला डावरे स्वत:ची ट्रॅव्हल कंपनी सांभाळतात.


Post a Comment (0)
Previous Post Next Post