विवेक अग्रवाल सांगतात. कि “बहुतेक घरांमध्ये जुनी वर्तमानपत्रे सांभाळून ठेवली जातात. कारण हा
असा कचरा आहे, ज्याच्या बदल्यात लोकांना पैसे मिळतात.
काही लोक प्लास्टिकच्या बाटल्या, कॅन इत्यादी वस्तू ठेवतात. पण कोणीही
आपल्या घरात पॉलीबॅग, रॅपर, काचेच्या
वस्तू किंवा मेटल वगैरे ठेवत नाही. दररोज येणारी दूध-दह्याची पाकिटे बहुतेक
डस्टबिनमध्ये जातात. पण जर लोकांना अशा कचऱ्याच्या बदल्यात काही मिळू लागले तर ते
हा कचरा गोळा करतील आणि रिसायकलिंगसाठी देतील,”
विवेकने यूनिवर्सिटी ऑफ़ बिर्मिंघम
मधून सिव्हिल इंजिनीअरिंग केले आहे आणि अभिषेकने यूनिवर्सिटी ऑफ़ टेक्सस मधून
मास्टर्स पदवी घेतली आहे. ते सांगतात “आम्ही
लहानपणापासूनचे मित्र आहोत आणि दोघेही व्यावसायिक कुटुंबातील आहोत. त्यामुळे
शिक्षण पूर्ण झाल्यावर आम्ही काही काळ आमचा कौटुंबिक व्यवसाय सांभाळला. पण आम्हाला
नेहमीच काहीतरी वेगळं करायचं होतं. त्यामुळे आम्ही कचरा व्यवस्थापनाच्या क्षेत्रात
बिज़नेस मॉडल तयार करण्याचा निर्णय घेतला.
विवेक आणि अभिषेकने २०१९ मध्ये ‘रद्दी बाजार’ सुरू
केले आणि यावर्षी अश्विनही त्यांच्यासोबत सामील झाला. रद्दी बाजार तीन मॉडेल्सवर
काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. पहिले मॉडेल हाऊसिंग सोसायटीचे आहे जेणेकरुन
लोकांना कचरा व्यवस्थापनाबाबत जागरूक केले जाईल. जसे ते वृत्तपत्रांना ‘रद्दी ‘ म्हणून वेगळे ठेवतात. त्याचप्रमाणे इतर
कचरा (ज्याचा रीसायकल किंवा अपसायकल करता येतो) देखील गोळा करून साठवता येतो.
जेणेकरून लँडफिल आणि पाण्याचे स्त्रोत वाचवता येतील.
दुसरे मॉडेल रिटेल क्षेत्रासाठी आहे.
ज्याद्वारे त्यांची टीम बाजारातील दुकाने आणि दुकानांमधून कचरा गोळा करते. तिसरे
मॉडेल उद्योग क्षेत्रासाठी आहे. याद्वारे ते वेगवेगळ्या कंपन्यांशी टाय-अप करतात.
रद्दी बाजार ची टीम सुमारे आठ प्रकारचा कचरा गोळा करते ज्यात कागद, प्लास्टिक, काच, मेटल
आणि इलेक्ट्रॉनिक कचरा यांचा समावेश आहे . ते सांगतात “आम्ही
हैदराबादमध्ये कुकटपल्ली, सिकंदराबाद आणि दिलसुखनगर अशा
वेगवेगळ्या ठिकाणी तीन कियोस्क (सेंटर) उभारले आहेत. येथे कोणत्याही हाउसिंग किंवा
रिटेल सेक्टर छे लोक कचरा देऊ शकतात. जर तुम्हाला कचरा द्यायचा असेल, तर तुम्हाला पैसे दिले जातील किंवा तुमच्या कचऱ्याच्या खर्चावर
आधारित अपसायकल्ड स्टेशनरी उत्पादन दिली जातील,”
![]() |
अभिषेक रेड्डी, विवेक अग्रवाल आणि अश्विन रेड्डी |
रद्दी बाजार कंपनी नेहमी वेळेवर काम
करते असे त्याचा एक क्लायंट सांगतो. सहा महिन्यांहून अधिक काळापासून ते त्यांची
सेवा घेत आहेत. या कालावधीत एकही दिवस असा झालेला नाही की, रद्दी
बाजार च्या पथकाने कचरा उचलण्यास उशीर केला असेल. ते अतिशय प्रोफेशनल पद्धतीने काम
करतात.
रद्दी बाजारची टीम दर महिन्याला सुमारे
४५० टन कचरा गोळा करते. ज्यामध्ये सर्वाधिक अलग-अलग प्रकारचा प्लास्टिक कचरा आहे.
कचरा गोळा केल्यानंतर त्याचे अलग-अलग केले जाते. सर्व प्रकारच्या कचऱ्याचे अलग-अलग
केल्यानंतर त्याचा रीसाइक्लिंग वापर केला जातो.
रद्दी बाजारची टीम दर महिन्याला सुमारे
४५० टन कचरा गोळा करते. ज्यामध्ये सर्वाधिक अलग-अलग प्रकारचा प्लास्टिक कचरा आहे.
कचरा गोळा केल्यानंतर त्याचे अलग-अलग केले जाते. सर्व प्रकारच्या कचऱ्याचे अलग-अलग
केल्यानंतर त्याचा रीसाइक्लिंग वापर केला जातो.
सर्वात मनोरंजक गोष्ट म्हणजे त्यांना
मार्केटिंगवर कधीही खर्च करावा लागला नाही. त्याच्या कंपनीचे कोणतेही सोशल मीडिया
पेज नाही. ते म्हणतात, “हे अस एक क्षेत्र आहे ज्याला अधिकाधिक
कचरा व्यवस्थापनाची गरज आहे. त्यामुळे आम्हाला कधीच प्रसिद्धी करायची गरज पडली
नाही. आम्ही आमच्या कोणत्याही कामाचे फोटो काढत नाही. शक्य तितक्या कचऱ्याचे
व्यवस्थापन करणे आणि तो कचरा पर्यावरणात जाण्यापासून थांबविणे हे आमचे उद्दिष्ट
आहे.”
ते सांगतात रद्दीबाजारची टीम ज्या
कंपन्यांकडून कचरा उचलते. तसेच त्यांना दर महिन्याला रिपोर्ट पठवतात. ज्यामध्ये
त्याना सांगितले जाते कचरा व्यवस्थापनासारख्या त्यांच्या एका पावलामुळे त्यांनी
किती पाणी प्रदूषित होण्यापासून वाचवलेआणि किती झाडे त्यांनी सुरक्षित केली। “आम्हाला विश्वास आहे की अशा प्रकारे आपण लोकांची मानसिकता बदलू शकतो.
त्यांचे एक पाऊल समाज आणि पर्यावरणासाठी कसे फायदेशीर ठरत आहे हे त्यांना सांगितले
तर त्यांना पुढे काम करण्याची प्रेरणा मिळते,”
आतापर्यंत एक लाखाहून अधिक झाडे आणि एक
कोटी लिटरहून अधिक पाणी प्रदूषित होण्यापासून वाचवण्यात या स्टार्टअपला यश आले
आहे. कारण आपल्या देशात अत्यंत कमी प्रमाणात कचऱ्याचा रीसायकल किंवा अपसायकलकेला
जातो. बहुतेक कचरा लँडफिल किंवा नद्यांमध्ये जातो, ज्यामुळे
आपले जलस्रोत आणि जंगले प्रदूषित होत आहेत. त्याचबरोबर जमीन प्रदूषण आणि वायू
प्रदूषणही वाढत आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या घरातील कचरा किमान डस्टबिनमध्ये
जाण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.