हजारो झाडे लावणारी आणि त्या झाडांना जगवणाऱ्या 107 वर्षांच्या ‘वृक्षमाता’ सालूमरदा थिम्माक्का

सालुमरदा थिम्माक्का या कर्नाटक राज्यातील बेंगळूरूपासून ८० किमी अंतरावर असणाऱ्या हुलिकल या गावातील पर्यावरण संरक्षणासाठी कार्यरत व्यक्ती आहे. त्यांचे वय १०५ वर्षे असून भारत सरकारने त्यांना २०१९ चा पद्मश्री पुरस्कार दिला. सालुमरदा थिम्माक्का यांचा बीबीसीच्या १०० प्रभावी पर्यावरणवादी महिलांच्या यादीत समावेश आहे. त्यांनी ८००० पेक्षा जास्त झाडे लावून त्यांचे उत्तम संगोपन केले आहे.या कामाबद्दल त्यांना राष्ट्रीय नागरी सन्मान (नॅशनल सिटीझन अवार्ड) देण्यात आला.


थिम्माक्कांचा जन्म कर्नाटकच्या रामनगर जिल्ह्यातील मगाडी तालुक्यातील हुलिकल या गावात झाला. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने त्यांना शिक्षण घेता आले नाही. बालपणापासून मजुरी करावी लागली. सल्लुमाराडा या कन्नड भाषेतील शब्दाचा अर्थ ‘एका रांगेतील झाडे’ असा होतो. ते रहात असलेल्या खेड्यात वडाची रोपे पुष्कळ होती. ती रोपटी काढून त्याचे महामार्गालगत प्रत्यारोपण करण्याचे काम त्यांनी केले. ते दांपत्य रोज पाण्याचे चार डबे घेऊन निघायचे व त्या झाडांना पाणी द्यायचे.झाडे मोठी झाल्यावर ती जनावरांनी खाऊ नयेत म्हणून त्याभोवती काट्यांचे कुंपणही त्यांनी तयार केले.रोपणानंतरच्या दुसऱ्या पावसाळ्यानंतर ती झाडे मुळं धरून जोमाने वाढत असत.दर वर्षी दहा ते वीस इतकी झाडे लावण्याचे व त्यांना जगविण्याचे काम त्यांनी केले.त्यांनी लावलेल्या झाडांची किंमत सुमारे १५ लाख भरली.

बिक्कलू चिक्कया यांच्यासी लग्न झाल्यानंतर थिममक्का हुलिकल येथे राहायला आल्या. दिवसभर काम करुन मिळावलेले पैश्यात पोट भरायचं अशा परिस्थितीमध्ये हे दोघे गावामध्येच पडेल ते काम करु लागले. लग्नाला अनेक वर्षे उलटली तरी या दोघांना मूल होईना. मात्र हुलिकलसारख्या लहान गावामध्ये या विषयावरुन चर्चा होऊ लागली आणि या दोघांना त्याचा त्रास होऊ लागला. या गोष्टीकडून लक्ष विचलित करण्यासाठी दोघेही काहीतरी वेगळं करण्याच्या विचारात होते. त्याच वेळी हुलिकल गावाच्या जवळ रस्ता बांधण्यास सुरुवात झाली. या रस्त्याच्या बाजूने झाडं लावण्याची कल्पना थिममक्का च्या मनात आली. त्यानुसार थिमक्का रोज एक वडाचं झाड या रस्त्याच्या बाजूला लावू लागल्या. या कामामध्ये त्यांना पती बिक्कलूही मदत करायचे. या दोघांनी गावकऱ्यांकडून होणाऱ्या चर्चेकडे दूर्लक्ष करण्याच्या उद्देशाने सुरु केलेल्या या वड लागवडीमधील झाडांची संख्या साडेतीनशेहून अधिक झाली. दोघेही मिळून या झाडांना पाणी घालायचे, त्यांची आपल्या मुलांप्रमाणे काळजी घ्यायचे. आज हुलिकल गाव येण्याआधीपासूनच चार किलोमीटरवरुन रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वटवृक्षांची रांगच दिसते. रस्त्याच्या दोन्ही बाजूने वडाची झाडं असलेला हा सुमारे चार किलोमीटरचा पट्टा म्हणजे थिमक्का आणि बिक्कलू यांनी काही दशकांपूर्वी दुतर्फा लावलेली वडाची रोपटी, जी आता वटवृक्ष झाली आहेत. थिमक्का नावाने काम सुरु करणाऱ्या या आजीबाईंना आता ‘सालुमरदा थिममक्का’ असं नाव मिळालं आहे. ‘सालुमरदा’ या कानडी शब्दाचा अर्थ होतो एका रांगेत लावलेली झाडं. आता थिमक्का यांचा वारसा त्यांचा दत्तक पुत्र असणाऱ्या उमेशनेही सुरु ठेवला असून तो रोज एक झाड लावतो. १९९१ साली बिक्कलू यांचे निधन झाल्यानंतरही थिमक्कांनी आपले काम सुरु ठेवले आहे.

‘सालुमरदा थिममक्का’ ह्या भारतातील, विशेषतः स्त्रियांच्या इच्छाशक्तीचे, दृढनिश्चयाचे आणि चिकाटीचे जिवंत चित्र आहे.

Post a Comment (0)
Previous Post Next Post