ISO प्रमाणपत्राचे अनेक फायदे आहेत जसे की ते उत्पादनाची गुणवत्ता सुधारते, व्यवसाय कार्यक्षमता, आंतरराष्ट्रीय स्तरावर विश्वासार्हता निर्माण करते, सुलभ विक्रीयोग्यता आणि बरेच फायदे ISO प्रमाणपत्रामुळे व्यवसायाला मिळते.एखाद्या कंपनीने त्याच्या उत्पादनांच्या किंवा सेवांच्या मार्केटिंगमध्ये ISO लोगोचा वापर केला असेल तर ग्राहक त्याच्याशी संपर्क साधण्याची शक्यता जास्त असते यात शंका नाही. आयएसओ प्रमाणपत्राचे काही फायदे खालीलप्रमाणे आहेत.
उच्च विश्वासपात्रता (HIGH CREDIBILITY)
जागतिक स्तरावर, INTERNATIONAL ORGANIZATION FOR STANDARDIZATION (ISO) स्वीकार्य असल्याने, तुमची उत्पादने किंवा सेवांबद्दल ग्राहकांच्या मनात (RELIABILITY) विश्वसनीयता आणि (INTEGRITY) अखंडता वाढेल.
उच्च ओळख (HIGH RECOGNITION)
तुमच्या व्यवसायाचा ब्रँड जगभरात ओळखला जाईल. यामुळे इतर बाजार संशोधक (MARKET RESEARCHERS) आणि लोकांमध्येही तुमचा व्यावसायिक दर्जा वाढेल.
सुसंगतता सुधारते (IMPROVED CONSISTENCY)
ISO 9001 तुम्हाला तुमच्या व्यवसाय प्रक्रियेचे (BUSINESS PROCESSES) नियंत्रण वाढवण्यासाठी समर्थन देते. तुम्ही तुमच्या व्यवसायावर जितके जास्त नियंत्रण ठेवता तितके तुमचे सुसंगतता (CONSISTENCY) वाढते. वाढलेली सुसंगतता (CONSISTENCY) म्हणजे तुमचे ग्राहक प्रत्येक वेळी तुमच्यासोबत व्यवसाय करत असताना त्यांना नेहमी समान चांगली सेवा (SAME GOOD SERVICE) किंवा समान चांगली उत्पादने (SAME GOOD PRODUCTS) मिळत असते.
उत्पन्न वाढवते (ENHANCED REVENUES)
जेव्हा गुणवत्तेची खात्री असते, तेव्हा लोक तुमच्याकडे वारंवार येतात. जेव्हा तुमचा व्यवसाय ISO प्रमाणित (ISO Certified) असेल, तेव्हा तुम्ही तुमच्या उत्पादनाची व सेवेची किंमत तुम्ही ठरवू शकता. त्यामुळे तुम्ही अधिक उत्पना (ENHANCED REVENUES) ची अपेक्षा हि करू शकता.
ISO चिन्हाचा वापर (Use of the ISO Symbol)
पॅकेजिंग आणि दस्तऐवजीकरण (PACKAGING AND DOCUMENTING) करताना तुम्ही तुमच्या उत्पादनाला ISO चिन्हाने अधिकृतपणे लेबल करू शकता. त्यामुळे उत्पादनाची जाहिरात करणे खूप मनोरंजक आणि सोपे (INTERESTING AND SIMPLE) होते. या ISO चिन्हाचा तुम्हाला अनेक प्रकारे फायदा होतो. उत्पादने आणि सेवा अपेक्षा पूर्ण करतात हे ग्राहकांना दाखवून कंपनी आपली ब्रँड दृश्यमानता (BRAND VISIBILITY) वाढवू शकते.
सोपे विपणन तंत्र (Easy Marketing Technique)
ISO तुम्हाला आणि तुमच्या उत्पादनांना अधिक मूल्य (VALUE) प्रदान करते. तुम्ही हा घटक (FACTOR) तुमचा जाहिरात बिंदू (ADVERTISING POINT) म्हणून वापरू शकता आणि तुम्ही तुमच्या उत्पादनांची सहज मार्केटिंग करू शकता.
उत्पादने/सेवांच्या सुरक्षिततेची हमी दिली जाते
(Safety of the Products/Services are Guaranteed)
जेव्हा एखादा व्यवसाय ISO प्रमाणित असते, तेव्हा त्या व्यवसायाच्या गुणवत्तेची हमी असते. मग सामान्य लोकच वापरात असलेल्या उत्पादने/सेवांच्या सुरक्षिततेची हमी देतात. ISO प्रमाणपत्र तुमची उत्पादने आणि सेवा परदेशी बाजारपेठेत नेण्यात मदत करते.
सरकारी निविदा (GOVERNMENT TENDERS)
सरकारी प्रकल्प निविदांसाठी (Government Project Tenders) आणि आंतरराष्ट्रीय निविदांसाठी अर्ज करण्यास पात्र होण्यासाठी ISO प्रमाणपत्र आवश्यक आहे.