अभ्यासासोबत घरच्या घरी १५००० रुपये गुंतवून सुरू केली ‘ऑरगॅनिक चॉकलेट फॅक्टरी’

rishabh-singla-organic-chocolate

हरियाणातील कैथल येथे राहणारा २५ वर्षीय ऋषभ सिंगला याने आपल्या घरातून श्याम जी चॉकलेट्स नावाने ऑर्गनिक चॉकलेट कंपनी सुरू केली आहे. ऋषभने कॉलेजच्या अभ्यासादरम्यान स्टार्टअप सुरू केला आणि आता तो पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहे. ऋषभ सांगतो , “माझे वडील ट्रेडिंग व्यवसाय करतात आणि माझी आई गृहिणी आहे. चॉकलेट बिझनेसची कल्पना सुचली तेव्हा मी बीबीए शिकत होतो. मला नेहमीच स्वतःचे काहीतरी काम करायचे होते, जेणेकरून माझी स्वतःची ओळख निर्माण व्हावी आणि इतरांना रोजगार देता यावा. त्यामुळे मी अभ्यासासोबतच या कल्पनेवर काम करायला सुरुवात केली.

सुरुवातीला ऋषभ त्याच्या आईडिया बद्दल फारसा स्पष्ट नव्हता. त्याला फक्त चॉकलेट्स बनवून ग्राहकांपर्यंत पोहोचवायची होती. त्यासाठी तो कैथलमधील एका ठिकाणाहून चॉकलेट बनवायला शिकला. तो म्हणतो , “पण जेव्हा आपण चॉकलेट बनवण्याबद्दल बोलतो, तेव्हा ते करण्याचे अनेक मार्ग आहेत. एक मार्ग म्हणजे बाजारात आधीच उपलब्ध असलेल्या ‘कंपाउंड’ पासून चॉकलेट बनविणे आणि दुसरा मार्ग म्हणजे शून्यापासून सर्वकाही तयार करने आणि नंतर चॉकलेट बनविणे. सोप्या भाषेत सांगायचे तर, ‘कोको बीन्स ते चॉकलेट बार’ ही संपूर्ण प्रक्रिया स्वतः करने. सुरुवातीला मी बाजारात उपलब्ध असलेल्या ‘कंपाउंड’ पासून च चॉकलेट बनवायला सुरुवात केली, पण नंतर माझ्या एका मित्राने मला ‘ऑरगॅनिक चॉकलेट’ बनवण्याचा सल्ला दिला.”

‘ऑरगॅनिक चॉकलेट’ शी संबंधित माहिती मिळवण्यासाठी ऋषभ अनेक ठिकाणी फिरला . तो कूर्ग येथेही गेला, जिथे कोको बीन्सची लागवड केली जाते. तो अनेक ‘चॉकलेट मेकर्स’ ला भेटला, पण ट्रेनिंग फी खूप जास्त होती. तो म्हणतो , “शेवटी माझा मुंबईत येऊन शोध संपला आणि मी तिथे राकेश सैनी यांच्याकडून प्रशिक्षण घेतले. प्रशिक्षणानंतर, मी केरळ, कर्नाटकमधील कोको शेतकऱ्यांकडून कोको बीन्स विकत घेतली आणि मग ‘ऑरगॅनिक’ चॉकलेट्स बनवायला सुरुवात केली.”

rishabh-singla-organic-chocolate

ऋषभने २०१७ मध्ये चॉकलेटचा बिझनेस सुरू केला, पण सुरुवातीला तो फक्त नॉर्मल चॉकलेट्स बनविले . २०१८ मध्ये प्रशिक्षण घेतल्यानंतर त्याने पूर्णपणे ‘ऑर्गेनिक चॉकलेट’ बनवण्याचा निर्णय घेतला.तो म्हणतो की, पूर्वी तो त्याचा घरातील स्वयंपाकघरातून काम करायचा . त्याची सुरुवातीची गुंतवणूक सुमारे १५००० रुपये होती. पण, जेव्हा त्याने फक्त ऑरगॅनिक चॉकलेट बनवायचे ठरवले तेव्हा त्याने त्याच्या घराच्या पहिल्या मजल्यावर च्या दोन खोल्या वापरल्या. एका खोलीत चॉकलेट बनवण्यासाठी लागणारी सर्व यंत्रसामग्री ठेवली आणि दुसऱ्या खोलीत चॉकलेट्स पॅकिंग आणि साठवण्याचं काम केलं. तो म्हणतो “सुरुवात अजिबात सोपी नव्हती, कारण सगळ्यात आधी घरच्यांनाही समजवायला वेळ लागला. यानंतर या सर्व कामातून काही होणार नाही, काही मिळणार नाही, असे नातेवाईक आणि ओळखीचे लोकही सांगायचे. अभ्यासावर लक्ष देण्याची वेळ आहे. पण मी मेहनत करत राहिलो आणि शिकत राहिलो. सुरुवातीला जे काही थोडेफार पैसे कमावले, ते परत व्यवसायातच टाकले. आजही मी फार मोठ्या स्तरावर काम करत नाही कारण मला हळू हळू पुढे जायचे आहे. आधीच अनेक मोठे ब्रँड असल्याने चॉकलेट क्षेत्रात ठसा उमटवणे खूप अवघड आहे. पण तरीही, आमची गुणवत्ता आणि चव ग्राहकांच्या पसंतीस उतरत असल्याने आम्ही पुढे जात आहोत.”

rishabh-singla-organic-chocolate

आज त्याला केवळ ग्राहकांकडूनच नव्हे तर त्याच्या कुटुंबाकडूनही पाठिंबा आणि कौतुक मिळत आहे. त्याची आई आशा राणी त्याच्यासोबत व्यवसाय करण्यात त्याला मदत करीत आहे. आशा राणी म्हणाल्या की, मला माझ्या मुलाचा अभिमान आहे. पूर्वी त्या फक्त घरातच राहायच्या , पण आता आपल्या मुलासोबत वेगवेगळ्या ठिकाणी जाते. नवीन लोकांना भेटतात आणि जेव्हा त्यांचे ग्राहक त्यांच्या चॉकलेटचे कौतुक करतात तेव्हा त्यांना खूप आनंद होतो.

चॉकलेट बनवण्याच्या प्रक्रियेबद्दल ते म्हणतात, “प्रथम कोको बीन्स भाजले जातात आणि नंतर ते सोलले जातात. नंतर कोको बीन्स ग्राइंडरमध्ये ग्राइंड केले जातात आणि कोको बीन्समधून निघलेल्या कोको बटरचाच पेस्ट बनविल्या जाते. वेगवेगळ्या चॉकलेट्ससाठी ग्राइंडिंग प्रक्रियेचा वेळ अलग अलग असतो यानंतर पेस्टमध्ये गुळाची पावडर टाकली जाते. आम्ही साखर अजिबात वापरत नाही आणि इतर कोणतेही एडिटिव किंवा प्रिज़र्वेटिव देखील वापरत नाही. सर्व चॉकलेट्समध्ये गुळाची पावडर वापरली जाते आणि चवीसाठी वेगवेगळी फळे, फुले आणि औषधी वनस्पतींचा वापर केला जातो.

rishabh-singla-organic-chocolate

महिन्याला तो सुमारे ६००० चॉकलेट बार तयार करतो आणि एक बार ५० ग्रॅमचा असतो. सध्या ते १० हून अधिक प्रकारचे चॉकलेट बार तयार करत आहेत ज्यात डार्क चॉकलेट, फाइबर चॉकलेट, चिया सीड चॉकलेट, अलसी चॉकलेट, ब्राह्मी चॉकलेट, लीची चॉकलेट, कोकोनट चॉकलेट, स्ट्रॉबेरी चॉकलेट इत्यादींचा समावेश आहे. चॉकलेट बार तयार झाल्यावर ते पॅक केले जाते आणि ऑर्डरनुसार पाठवले जाते. ऋषभने आपल्या या व्यवसायातून सहा जणांना रोजगारही दिला आहे. तो सांगतो “चॉकलेट बनवण्याची प्रक्रिया आई आणि मी करतो, पण आम्ही काही महिलांना पॅकेजिंग आणि इतर कामांसाठी नियुक्त केले आहे,”

rishabh-singla-organic-chocolate

मार्केटिंगबद्दल ऋषभ सांगतो सोशल मीडियावर स्वत:चे मार्केटिंग करण्याबरोबरच वेगवेगळ्या शहरांमध्ये आयोजित केलेल्या सेंद्रिय मेळ्यांमध्येही सहभागी होतो. आत्तापर्यंत त्यांनी जवळपास १५ वेगवेगळ्या जत्रेत त्यांचे स्टॉल लावले आहेत, ज्यामुळे त्याला अनेक लोकांशी थेट संपर्क साधण्याची संधी मिळाली. महिन्याला सुमारे ४०० ग्राहकांच्या ऑर्डर पूर्ण करण्याव्यतिरिक्त, ऋषभ गुजरात, पंजाब, महाराष्ट्र, राजस्थान यांसारख्या राज्यांमध्ये असलेल्या सुमारे ५० ऑरगॅनिक स्टोअरमध्ये चॉकलेट्स वितरीत करतो. तो सांगतो त्याची वार्षिक उलाढाल सुमारे १५ लाख रुपये आहे. अधिकाधिक लोकांना ‘ऑरगॅनिक चॉकलेट’ बद्दल जागरूक करण्याचा ऋषभचा पुढील प्रयत्न आहे. तो म्हणतो , “माझा व्यवसाय पुढे नेण्यासोबतच लोकांना शुद्ध अन्नाची जाणीव करून देणे हा माझा उद्देश आहे. जर आपल्याला निरोगी राहायचे असेल तर आपल्याला या गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे. म्हणूनच तो सर्वाना सांगतो कि तुम्ही जे काही खात आहात आणि तुमच्या कुटुंबाला खायला घालत आहात, त्या गोष्टींकडे लक्ष द्या आणि ते तुमच्यासाठी किती फायदेशीर आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा. तरच तुम्ही चांगले जीवन जगू शकाल.”

rishabh-singla-organic-chocolate
ऋषभची आई स्टॉल लावून चॉकलेट विकत आहे. ती ऋषभला चॉकलेट्स तयार करण्यात मदत करते.

ऋषभ हा प्रत्येक युवकासाठी प्रेरणा आहे ज्याला आपले काम करायचे आहे. तो फक्त तरुणांना सांगतो की तुमच्या आइडियाज वर काम करा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. खरी मेहनत आणि स्वताला झोकून देऊन काम करणाऱ्यांना यश नक्कीच मिळते.


x

Post a Comment (0)
Previous Post Next Post