महिलांनी एखादा बिझनेस उभा करणे सोपी गोष्ट नाही, त्यातही परिस्थिती अवघड तेव्हा होते, जेव्हा त्यांनी निवडलेले क्षेत्र हे काही वेगळे असते. रिचा कर यांनी जेव्हा व्यवसायाची सुरुवात केली तेव्हा घरातूनच अनेक प्रश्न उपस्थित केले गेले होते. जिने ऑनलाइन अंडरगार्मेट्स विक्रीसाठी ‘झिवामे’ (ZIVAME) ची सुरुवात केली. त्यावेळी त्यांच्या आईने म्हटले होते, मी माझ्या मैत्रिणींना काय सांगणार, माझी मुलगी ब्रा-पँटी विकते? आज त्याच मुलीने तिचा बिझनेस अब्जावधी रुपयांचा केला आहे.
रिचा कर यांचा जन्म १७ जुलै १९८० मध्ये झारखंड मधील जमशेदपूर शहरात झाला आहे. एका मध्यमवर्गीय कुटुंबातील आहेत त्या. त्यांच्या आई गृहिणी तर वडील टाटा स्टील कंपनीत काम करतात. लहापणापासूनच त्यांच्या घरातील वातावरण हे शैक्षणिक होते. त्यामुळे योग्य शिक्षण आणि त्याची गरज याची जाण रिचा कर यांना आधीपासूनच होती. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर बिरला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स पिलानी मधून त्यांनी पदवी मिळवली. पदवी पूर्ण झाल्यावर त्यांनी अभियांत्रिकी विभाग कंपनीत सोफ्टवेअर अनालीसिस म्हणून काम करण्यास सुरुवात केली.
पण रिचा कर यांना अगदी लहनपणापासूनच वेगळेच काहीतरी करायचे होते. त्यांना इतरांसारखे नोकरी करून समाधान मिळत नव्हते. त्यांचे स्वप्न, धेय काहीतरी वेगळं करण्यास भाग पाडत होते. त्यामुळे नोकरी करत करत एमबीए करण्याचा त्यांनी निर्णय घेतला आणि तो पूर्ण केला. मास्टर पूर्ण केल्यावर स्पेन्सर्स कंपनीत ब्रँड कम्युनिकेशन एरिया मॅनेजर या पदावर त्यांनी काम केले. हे काम करत असतानाच पुढे त्यांना २०१० मध्ये SAP सोबत व्यवसाय सल्लागार (CONSULTANT) म्हणून काम करण्याची संधी मिळाली. या कामामुळे त्यांना खूप काही शिकता आले. बिझनेस म्हणजे काय, तो कसा करायचा, व्यवसाय कशा प्रकारे काम करतो, त्यात येणारे धोके कोणते या सगळ्या खूप महत्त्वाच्या गोष्टी त्यांना समजल्या. याच लीडर शिपच्या अनुभवाने त्यांना झिवामे (ZIVAME) बनवण्याची प्रेरणा मिळाली.
व्यवसाय सुरू करण्यासाठी त्यांना खरतर खूप अडचणींना समोर जावे लागले. पैश्याची समस्या , बऱ्याच जणांचा विरोध, त्यांचा व्यवसाय ऐकुन त्यांच्यावर हसणे, आर्थिक अडचण अशा सगळ्याच गोष्टींचा त्यांना सामना करावा लागला. पहिला विरोध झाला तो त्यांच्या आईकडूनच. रिचा कर यांनी जेंव्हा त्यांच्या व्यवसायाची कल्पना घरच्यांना सांगितली तेंव्हा त्यांच्या आईने प्रखर विरोध केला. त्या म्हणाल्या माझ्या मैत्रीणीना,ओळखीच्या लोकांना,नातेवाईकांना मी काय सांगू ? माझी मुलगी पँट, ब्रा विकते. लोक काय म्हणतील ? किती नावं ठेवतील ? तसेच त्यांचा वडिलांना हि हा व्यवसाय काय आहे हे समजलेच नाही.
ओळखीचे लोक त्यांच्यावर हसत होते. पण रिचा यांचा निर्णय मात्र ठाम होता. काहीही झालं तरी त्यांना ठरवलेला व्यवसाय करायचाच होता. त्यांना इतका त्रास झाला की व्यवसायामुळे नोकरी सोडावी लागली. व्यवसायासाठी जागेची गरज तर पडणारच होती. रिचा जेंव्हा जागा बघण्यासाठी जात असत आणि लोक व्यवसायाबद्दल विचारत असत तेंव्हा रिचा बोलता बोलता थांबत असत आणि मी ऑनलाईन कपडे विकणार आहे असे सांगत असत. बऱ्याच अडचणींना सामोरे जाऊन जागा मिळाली तर पेमेंट गेटवे साठी परत बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागले. तरीही रिचा डगमगल्या नाहीत . कोणताही व्यवसाय हा उत्तम योजना आणि धोरण (PLAN AND STRATEGY) शिवाय वाढू शकत नाही. पण रिचा यांचे झालेले शिक्षण आणि कामाचा मिळालेला उत्तम अनुभव यामुळे “झिवामे” (ZIVAME) ची स्थापना केली.
झिवामे (ZIVAME) यशाच्या शिखरावर होते, त्यावेळी रिचा कर यांचा विवाह झाला नव्हता. म्हणजे खूप कमी वयात त्यांनी इतके मोठे यश मिळवले होते. त्या कॉलेजमध्ये असल्यापासून त्यांच्या वर्गातील केदार गोविंद यांच्या प्रेमात पडल्या होत्या. रिचा यांच्या आईला जशी व्यवसायाची आयडिया आवडली नव्हती तशीच ती केदार सरांच्या घरच्यांनाही आवडली नव्हती. केदार सरांच्या आई म्हणाल्या होत्या लोक काय म्हणतील? ओळखीच्या लोकांना काय उत्तर देऊ?
पण केदार सर मात्र अगदी सुरुवातीपासून रिचा कर यांच्या सोबत होते. प्रत्येक वेळी केदार सरांनी रिचा यांना पाठिंबा दिला होता,मदत केली होती. त्यामुळे केदार सरांनी त्यांच्या घरच्यांना समजावून सांगितले आणि रिचा खूप शिकलेल्या असल्याने व्यवसायात जरी यश मिळाले नाही तरी त्या नोकरी करतील असा केदार सरांच्या घरच्यांनी विचार केला होता. पुढे जाऊन रिचा यांनी केदार सरांशी लग्न केले आणि नात्याला बंधनात अडकवले.
जे काम करण्याची रीचाच्या संपूर्ण कुटुंबाला लाज वाटत होती, तेच काम स्वतःच्या बळावर आणि जिद्दिवर असे करून दाखवले ज्याचा कोणी कधी विचारही केला नव्हता. हे काम करण्यासाठी रिचा कर यांनी समाज, लोक काय म्हणतील याची कधीही पर्वा केली नाही. काम करताना त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. व्यवसाय सुरू करण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते तर प्रसंगी त्यांनी स्वतःची काही बचत आणि जवळच्या मित्र परिवारातील लोकांकडून पैसे गोळा करून ३५ लाख रुपयांची गुंतवणूक करून व्यवसाय उभा केला होता. या व्यवसायात २०१५-१६ साली त्यांना तब्बल ५४ करोडचे नुकसान सहन करावे लागले होते. तरीही त्यांनी हिम्मत सोडली नाही,खचून गेल्या नाहीत.
आपल्या ग्राहकांना चांगली सेवा देण्यावर रिचा विश्वास ठेवतात. त्यामुळे ग्राहकांचा विश्वास टिकून रहातो आणि व्यवसायात स्थिरता रहाते असे त्यांचे म्हणणे आहे. जे अगदीच योग्य आहे.