देहरादून मध्ये राहणारी 30 वर्षीय दिव्या रावत आज मशरूम लागवडीतील एक प्रसिद्ध नाव आहे. 'मशरूम गर्ल' या नावाने ओळखल्या जाणाऱ्या दिव्याला उत्तराखंड सरकारने मशरूमची ब्रँड एम्बेसडर बनवले आहे. आज दिव्या मशरूमच्या माध्यमातून वार्षिक ५ कोटींहून अधिकचा व्यवसाय करत आहे. मशरूम गर्ल दिव्या रावतची कथा तरूणांना केवळ प्रेरणाच देत नाही तर काहीतरी नवीन करायला शिकवते.
उत्तराखंड राज्यातील चमोली (गढवाल) जिल्ह्यापासून २५ किमी अंतरावर असलेल्या कोट कंडारा गावात राहणारी दिव्या रावत दिल्लीत शिकत होती, परंतु डोंगरातून होणारे स्थलांतर तिला त्रास देत होते, उत्तराखंडमध्ये स्थलांतर ही मोठी समस्या आहे. दरवर्षी राज्याच्या ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने लोक शहराकडे स्थलांतरित होतात म्हणून दिव्या २०१३ मध्ये उत्तराखंडला परतली आणि येथे मशरूमचे उत्पादन सुरू केले. दिव्या सांगते कि , "मी उत्तराखंडमधील बहुतेक घरांना कुलूपबंद पाहिलं. रोजगाराअभावी चार-पाच हजार रुपयांसाठी इथले लोक घरे रिकामे करून गाव सोडून जात होते. माझा निश्चय होता. मी नक्की करेन. काहीतरी जेणेकरून लोकांना डोंगरावर रोजगार मिळू शकेल. सामाजिक कार्यात पदव्युत्तर पदवी घेतल्यानंतर दिव्या रावत यांनी दिल्लीतील एका संस्थेत काही दिवस नोकरीही केली, पण तिला ती पसंत पडली नाही.
तिला आपल्या राज्यातील लोकांसाठी काहीतरी करायचे होते. हा प्रकार तेव्हा घडला जेव्हा दिव्या नोएडामधील एमिटी युनिव्हर्सिटीमधून सोशल वर्कमध्ये मास्टर्स करत होती. तिचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर, तिला एका नामांकित एनजीओमध्ये नोकरी देखील मिळाली, जिथे तिने मानवी हक्कांच्या मुद्द्यांवर काम केले. आपल्या राज्यातील लोकांना स्थलांतर करावे लागत आहे आणि मोठ्या शहरात येऊनही ते हलाखीचे जीवन जगत असल्याचे त्यांनी पाहिले, तेव्हाच त्यांना या दिशेने काहीतरी पुढाकार घेण्याची कल्पना सुचली आणि त्याच वेळी एक २०१३ मध्ये उत्तराखंडमध्ये भीषण पूर ही आला होता.
या भीषण पुरामुळे दुखावलेल्या दिव्याने लगेच नोकरी सोडली आणि निश्चय करून देहरादूनला परतली. यानंतर त्यांनी राज्यातील लोकांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करून देण्याचा उपक्रम सुरू केला आणि त्यासाठी त्यांनी मशरूमची लागवड आणि त्यावर प्रक्रिया करणे हे आपले ध्येय बनवले.
दिव्याने मशरूमची शेती सुरू केली कारण यातून सामान्य पिकांपेक्षा कितीतरी पट अधिक जास्त उत्पन्न मिळते. या बद्दल दिव्या म्हणते , “किमतीतील हा फरक शेतकऱ्यांचे जीवन बदलू शकतो. मी घरगुती प्रकल्प म्हणून मशरूमची शेती केली. मला शेती ला सोपी करायची होती जेणेकरून अधिकाधिक लोकांनी त्याचा अवलंब करुण शेती करावी. मी विस्तृत संशोधन केले, मशरूमची लागवड शिकली आणि अनेक प्रयोग केले. त्यानंतर मी उत्तराखंडच्या हवामानासाठी योग्य अशा पायाभूत सुविधांची व्यवस्था केली.”
दिव्या म्हणते, ‘मशरूम हे पाणी, जमीन, हवामान नसून तापमानाची लागवड आहे. यात मशरूम चे इतके प्रकार आहेत की आपण प्रत्येक हंगामात त्याची लागवड करू शकतो. तुम्ही ताजे मशरूम बाजारात विकू शकता आणि त्यापासून उपपदार्थ देखील बनवू शकता.
तेथिल शेतकरी दिव्याचे आभार म्हणतात कि दिव्यामुळे या हजारो घरांतील लोक १० ते १५ हजार रुपये महिना कमावतात. मशरूम हे असे पीक आहे ज्यामध्ये खर्च खूपच कमी असतो. उत्पादन २० दिवसांत सुरू होते आणि खर्च सुमारे ४५ दिवसांत निघतो. दिव्याने मशरूमची लागवड इतकी सोपी केली आहे की प्रत्येकजण ते शकते.
दिव्या उत्तराखंडमधील मशरूम लागवडीच्या क्षेत्रातील एक प्रसिद्ध नाव आहे. तिला 'मशरूम गर्ल' म्हणून ओळखले जाते. उत्तराखंड सरकारने त्यांना मशरूमचा ब्रँड एम्बेसडर म्हणूनही घोषित केले आहे. दिव्याच्या या उपक्रमामुळे आज तिला दरवर्षी ५ कोटींहून अधिक कमाई होत नाही, तर उत्तराखंडसह देशाच्या विविध भागातील ७००० हून अधिक शेतकर्यांनाही लाभ मिळत आहे. ती पुढे म्हणते, “आज माझ्यासोबत उत्पादनांना अधिक चांगले मूल्य देण्यासाठी आणि नवीन बाजारपेठा शोधण्यासाठी माझ्यासोबत काम करणारे शंभरहून अधिक भागीदार आहेत. मशरूमच्या लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही एक इनक्यूबेशन सेंटर म्हणून काम करत आहोत, ज्याअंतर्गत शेतकऱ्यांना नवीन तंत्र, विपणन, योजना इत्यादींची माहिती दिली जाते.
दिव्या आणि तिच्या कंपनीने आतापर्यंत उत्तराखंडमधील १० जिल्ह्यांमध्ये मशरूम उत्पादनाची ५३ युनिट्स उभारली आहेत. एक स्टेंडर्ड यूनिट ३०००० रुपयांपासून सुरू होते, ज्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर वर १५ हजार खर्च केले जातात आणि जे दहा वर्षे टिकतात, १५ हजार हा त्याचा उत्पादन खर्च आहे. दिव्या सांगते, आम्ही लोकांना रोजगार देत नाही, तर त्यांना सक्षम बनवतो, गावोगावात जाऊन लोकांना प्रशिक्षित केले आहे. आता त्याचा परिणाम दिसून येत आहे, ती सांगेते लोकांनाही हे काम करायचे आहे. ते सांगते के एका वर्षात ५०० युनिट चे लक्ष पूर्ण कार्याचे आहे.
ब्रँड एम्बेसडर असूनही ती रस्त्यावर उभी राहून स्वत: मशरूम विकते, जेणेकरून तेथील महिलांचा मनातील संकोच दूर होईल आणि तय स्वत: मशरूम विकेल. दिव्या सांगते की, उत्तराखंडमध्ये सध्या पुरेशा प्रमाणात मशरूमचे उत्पादन होत नाही की ते बाहेर निर्यात केले जाऊ शकत नाही जिथे भरपूर मशरूमचा वापर केला जातो. ती म्हणते, पर्वतीय महिला खूप सहनशील असतात, मशरूम त्यांना श्रीमंत देखील करेल.
मशरूमच्या लागवडीद्वारे हजारो शेतकर्यांना उपजीविकेचे उत्तम पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी, महिलांचे सक्षमीकरण, शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी आणि शेतीमध्ये नवनवीन गोष्टींचा अवलंब करण्यासाठी २०१६ मध्ये त्यांना कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते नारी शक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.
दिव्या सांगते , “सुरुवातीच्या काळात मशरूमच्या लागवडीबाबत लोकांची मानसिकता बदलणे हे सर्वात मोठे आव्हान होते. पण, हिम्मत न हारता हळूहळू व्यवसाय वाढवत मशरूमची शेती ही फायदेशीर शेती आहे, हे शेतकऱ्यांना पटवून दिले.
तिच्या भविष्यातील योजनांबद्दल बोलताना दिव्या म्हणते, “आमच्या उत्पादनांची मागणी देशभरात दिवसेंदिवस वाढत आहे. हे लक्षात घेऊन मी लवकरच माझा 'द माउंटन मशरूम' हा आणखी एक उपक्रम सुरू करणार आहे. या अंतर्गत मी किरकोळ आणि हॉटेल्सना मशरूमचा पुरवठा करणार आहे. देहरादून व्यतिरिक्त त्याची कार्यालये पुणे, गोवा अशा अनेक ठिकाणी असतील. याद्वारे दररोज सुमारे २ हजार किलो मशरूमचे उत्पादन करण्याचेआमचे उद्दिष्ट आहे. यामुळे दरवर्षी सुमारे २० कोटींची उलाढाल होणार आहे.