डॉ. सीमा राव या देशातील पहिल्या आणि एकमेव महिला कमांडो ट्रेनर आहेत. ज्या लष्करातील कमांडोंना प्रशिक्षण देतात. आतापर्यंत त्यांनी तब्बल २० हजार कमांडोंना प्रशिक्षण दिल्याचे सांगितले जाते. विशेष असे की, डॉ. सीमा राव यांनी कोणत्याही मोबदलाशिवाय 18 वर्षे भारतीय लष्करी दलांना प्रशिक्षित केले. प्रशिक्षणासाठी एक रूपयाही पगार अथवा मानधन घेतले नाही.
डॉ. सीमा राव यांचा जन्म भारतातील स्वातंत्र्य सैनिक प्रोफेसर रमाकांत यांच्या कडे मुंबई मधील वांद्रे येथे झाला. गोव्यात पोर्तुगिजांसोबत झालेल्या संघर्षात त्यांच्या वडिलांनी मोठी भूमिका सांभाळली होती. त्यांना देशसेवेची भावना घरातील परंपरेनेच मिळाली.
पति मेजर दीपक राव यांचा कडून त्यांना नेहमी प्रेरणा मिळाली. डॉ. सीमा राव यांनी अमेरिकेतील पॅडी येथून स्कूबा डाइविंग, आर्मी इंस्टीट्यूट ऑफ माउंटेनियरिंग से माउंटेनियरिंग, ताइंक्वाडो आदींचे प्रशिक्षण घेतले. लग्न झाल्यावर पती मेजर दीपक राव यांच्या प्रेरणेने त्यांच्याकडून मार्शल आर्ट चे प्रशिक्षण घेतले आणि मार्शल आर्ट्समध्येही ब्लॅक बेल्ट हि मिळवला. तसेच एअर रायफल शूटिंगमध्येही प्राविण्य मिळवले. त्या जगभरातील १० महिलांपैकी एक आहेत. ज्यांनी ‘जीत कुने दो’ अत्मसात केले आहे. हा एक मार्शल आर्टमधीलच पण अत्यंत अवघड असा प्रकार आहे. हा प्रकार ब्रुसलीनेही शिकला होता. डॉ. सीमा यांचे वेशिष्ट्य असे की, त्या ३० यार्डातील रेंजमध्ये कोणत्याही प्रकारच्या शत्रूवर अचूक निशाणा साधू शकतात. त्या म्हणतात , ‘महिला म्हणून मी सैनिकांना युद्धकौशल्यांचे प्रशिक्षण देऊ शकेन, अशी कोणालाच अपेक्षा नव्हती. पण माझ्या कौशल्यामुळे मी कॉम्बैट शूटिंग प्रशिक्षक बनू शकली.
![]() |
डॉ सीमा राव आणि मेजर दीपक राव लष्करप्रमुख जनरल विजय कुमार सिंह यांच्याकडून प्रशस्तिपत्र स्वीकारताना. |
डॉ. सिमा राव यांचं म्हणणे आहे जर महिलांची इच्छा असेल तर त्या काहीही करू शकतात, त्यांना फक्त त्यांच्या स्वप्नांचा पाठलाग कसा करायचा हे माहित असणे आवश्यक आहे. त्या सांगतात इथपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली आहे. गोठवणारी थंडी, कडक उन्ह, घनदाट जंगलापासून ते शत्रूंच्या प्रभावाखाली असलेल्या भागात राहण्यापर्यंत प्रत्येक परिस्थितीसाठी त्यांनी स्वत:ला तयार केले आहे. त्यांच्या शरीरात क्वचितच असे कोणतेही हाड असेल जे तुटलेले नाही. डॉ.सीमा राव एकदा 50 फूट उंचीवरून पडल्या होत्या. त्यांच्या मणक्याला फ्रॅक्चर झाले. त्या म्हणतात , ‘वडिलांचे निधन हा धक्काच होता. प्रशिक्षणादरम्यान त्यांचे फोकस कमी झाल्याने त्या डोक्यावर पडल्या . डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे डॉ. सिमा राव यांची अनेक महिने स्मरणशक्ती गेली. पण सगळ्या गोष्टी त्यांची हिम्मत तोडू शकली नाही. त्या सांगतात मी माझे अनुभव इतरांना पुस्तके आणि प्रेरक भाषणाद्वारे सांगू लागले. कॉर्पोरेट्सशिवाय त्या शैक्षणिक संस्थांमध्ये सेशन घेतात . त्यांनी पाच वेळा TEDx इवेंट या कार्यक्रमांना हजेरी लावली आहे.